बिहारची (Bihar) राजधानी पाटणा (Patna) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका संतापलेल्या तरुणीने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर (Private Parts) चाकूने हल्ला केला आहे. त्यानंतर तरुणाला गंभीर अवस्थेत पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्झिबिशन रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली. हा तरुण सीआरपीएफचा जवान असून सध्या सुकमा (छत्तीसगड) येथे तैनात आहे.
पोलिसांनी नेहा कुमारी नावाच्या या आरोपी तरुणीला ताब्यात घेतले आहे. ही मुलगी मूळची दरभंग्याची असून, ती गेल्या चार वर्षांपासून पाटण्यात शिकत होती. पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, सीआरपीएफ जवान आणि तरुणीचे गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. मात्र 23 मे रोजी जवानाच्या कुटुंबीयांनी शिवहर येथील एका तरुणीसोबत त्याचे लग्न निश्चित केले. ही बाब त्याच्या प्रेयसीला समजली.
चिडलेल्या प्रेयसीने लगेच आपल्या प्रियकराला पाटण्याला बोलावून घेतले. जर तो आला नाही तर आपण आत्महत्या करू अशी धमकीही तिने दिली. यानंतर सीआरपीएफ जवान 3 जून रोजी सुकमाहून पाटणा येथे पोहोचला आणि एका हॉटेलमध्ये थांबला. तरुणीच्या अती दबावामुळे जवानाने 5 जून रोजी पाटणा सिटी कोर्टात जाऊन तिच्याशी लग्नही केले.
लग्नानंतर दोघे हॉटेलवर पोहोचले. जिथे युवतीने शिवहरच्या तरुणीसोबतचे लग्न मोडण्यासाठी तरुणावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये याबाबत बराच वेळ बोलणे झाले मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बुधवारी पुन्हा तरुणीने याबाबत वाद घालायला सुरुवात केली. दोघांमध्ये बाचाबाची झाली व वादाचे रुपांतर मोठ्या भांडणामध्ये झाले. त्यानंतर चिडलेल्या तरुणीने जवानाच्या प्रायव्हेट पार्टवर चाकूने हल्ला केला. (हेही वाचा: '3 इडियट्स' चित्रपटाप्रमाणे नर्सने डॉक्टरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे केली गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया; नर्सने कापली नस, जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू)
गांधी मैदानाचे एसएचओ सुनील कुमार राजवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि तो मदतीसाठी ओरडत खोलीबाहेर पळाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत पीएमसीएचमध्ये नेले. आता जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दुसरीकडे महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.