Mamata Banerjee (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगालच्या (West bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनोख्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवला. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चालवत त्या राज्य सचिवालय नबान्न येथे पोहचल्या. स्कूटर राज्य सरकार मधील मंत्री आणि कोलकाताचे महापौर फरहाद हकीम चालवत होते. अशातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्कूटर चालवण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळी त्यांचा तोल जात पडता पडता वाचल्याचे दिसून आले.

ममता बॅनर्जी ज्यावेळी स्कूटरवर बसल्या त्यावेळी त्यांनी गळ्यात एक बोर्ड घातला होता. त्यामध्ये वाढलेल्या इंधन दाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यांनी हेल्मेट सुद्धा घातले होते आणि हाजरा मोड येथून राज्य सचिवालयापर्यंत सात किमीचे अंतर स्कूटरवरुन कापले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नागरिकांसोबत हात मिळवत त्यांना अभिवादन सुद्धा केले.(Mamata Banerjee on a Scooter: मंत्र्यांनी चालवली स्कूटर, पाठिमागे बसल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; पेट्रोल डिझेल दरवाढीचा हटके विरोध)

Tweet:

जवळजवळ 45 मिनिटांच्या प्रवासानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर हल्लाबोल करत असे म्हटले की, आम्ही इंधन दरवाढीला विरोध करत आहोत. मोदी सरकार फक्त खोटी आश्वासने देते. त्यांनी इंधनाचे दर कमी करण्यासाठी काहीच केले नाही. तुम्ही मोदी सरकारची सत्ता येणे आणि वाढलेल्या पेट्रोलच्या दरांमधील अंतराची तुलना करु शकता.

पुढे ममता बॅनर्जी यांनी असे म्हटले की, शुक्रवार पासून तृणमूल काँग्रेसकडून वाढलेल्या इंधन दराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने लोकांना फुकटात एलपीजी कनेक्शन देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता इंधनाचे दर वाढले जात आहेत. त्यांनी असे ही म्हटले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला विकत आहेत. नफा होणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांची ते विक्री करत आहेत. हे जनविरोधी, महिला विरोधी, युवा विरोधी आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.