Wedding Cancels for No Mutton Bone Marrow: जेवणात मटणाची नळी नाही? थेट लग्नच रद्द, नवरदेवाकडील कुटुंबाचा निर्णय
Mutton | Representational Image (Photo Credits: Pixabay)

थाटामाटात होणाऱ्या लग्न (Wedding) समारंभात जेवण हा अर्थातच महत्त्वाचा घटक. पण तो इतकाही महत्त्वाचा नाही की, लग्न मोडण्याचा निमित्त ठरावा. आणि ठरलाच तरीही त्यातील एखाद्या पदार्थावरुन लग्न मोडले जावे हा तसा काहीसा विचित्र आणि विक्षिप्त वाटावा असाच प्रकार. पण, हा प्रकार घडला आहे खरा. तेलंगणातील जगत्याल (Jagtiyal) येथील नवरदेवाकडील एका कुटुंबाने चक्क लग्न मोडले आहे. तेही केवळ मांसाहारी जेवणामध्ये (Non-vegetarian Menu) मटन थालीमध्ये हड्डीची नळी अर्थातच Mutton Bone Marrow मिळाली नाही म्हणून. वऱ्हाडी मंडळींच्या या अचाट वागण्याची सध्या परिसर आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे.

Mutton Bone Marrow वरुन वाद

निझामाबाद (Nizamabad) येथील मुलगी आणि जगत्याल (Jagtiyal) येथील मुलगा. या दोन तरुण तरुणीचा विवाह ठरला. दोघांच्याही कुटुंबीयांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न लावायचे ठरवले. मुहूर्त निघाला, लग्नाचा बस्ताही बांधला. विवाहाचे स्थळ निश्चित केले आणि जेवणावळीसाठी केटरर्सला कंत्राटही दिले गेले. जेवणाचे पदार्थ ठरले. सर्व काही ठरल्याप्रमाणे. अगदी अचूक व्यवस्थापन. पण, लग्नाच्या दिवशी घडले भलतेच. इतक्या सगळ्या जेवणाच्या पदार्थांमध्ये केवळ एक अपवाद राहिला. तो म्हणजे 'Mutton Bone Marrow'. म्हणजेच ज्याला मराठीमध्ये मटनाची नळी असेही म्हणतात. झाले. नवरदेवाकडील मंडळी प्रचंड चिडली. मुख्य मेन्यूमध्ये जेवणाची नळी नाही म्हणजे काय? (हेही वाचा, Goat's Eye Kills Man: बकऱ्याच्या डोळा, बेतला जीवावर; एकाचा मृत्यू; छत्तीसगड राज्यातील घटना)

मांसाहारी मेन्यू का नाही ठेवला?

नवरीच्या निवासस्थानीच विवाह स्थळ होते. वऱ्हाडी मंडळी वरात घेऊन आलेही होते. ठरल्या प्रमाणे पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडत होता. नवरीकडील मंडळींनी सर्वांसाठीच शाकाहारी जेवण ठेवले होते. नवरा आणि नवरीकडील मंडळी अशा सर्वांसाठीच शाकाहारी जेवण होते. पण, नवरदेवाकडील काही मंडळींनी मांसाहारी जेवणावरुन आणि खास करु Mutton Bone Marrow न ठेवल्याबद्दल वाद घालण्यास सुरुवात केली. नवरीकडील मंडळींनी आपण मांसाहारी मेन्यूच ठेवला नसल्याचे स्पष्ट केले तेव्हा हा वाद आणखी वाढला. (हेही वाचा, Vegetarian vs Non Vegetarian: शाकाहारी की मांसाहारी? तुम्ही कशाला देणार प्राधान्य? जाणून घ्या फायदे तोटे)

पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न

दरम्यान, दोन्ही बाजूंचा वाद इतका विकोपाला गेला की, शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी नवरदेवाकडील मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, नवरीकडील मंडळींनी आपला आपमान केला असा आरोप करत ते ठाम राहिले. परिणामी त्यांनी लग्नच रद्द करण्याचा प्रयत्न केला. जेवणाचा मेन्यू ठरवताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगितले जात आहे की, ही घटना तेलुगू भाषेत अलिकडेच गाजलेल्या एका चित्रपटाप्रमाणे घडली आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या 'बालागम' चित्रपटात दोन कुटुंबांमधील मटण बोन मॅरोवरून झालेल्या वादानंतर लग्न रद्द झाल्याचे दाखवण्यात आले आहे.