डॉक्टरांप्रमाणेच रुग्णांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या आणि त्यांना आजारातून बरे करण्यासाठी दिवसरात्र एक करणा-या परिचारिकांचा विशेष सन्मान करण्यासाठी आज म्हणजेच 12 मे ला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन ( International Nurse Day) साजरा केला जातो. आज संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध एक मोठे युद्ध लढत आहेत. या लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावणा-या कोविड योद्धांपैकी एक परिचारिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या दिनाचे औचित्य साधून विशेष आभार मानले आहेत. कोविड-19 सारख्या भयाण आजाराविरुद्ध झुंज देणा-या या परिचारिका आणि त्यांच्या कुटूंबियांचे आभार मानत खास ट्विट केले आहे.
"आपला देश निरोगी ठेवण्यासाठी 24X7 अभूतपूर्व काम करणा-या व परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक विशेष दिवस आहे. सध्या देशात आलेल्या कोरोना विषाणूला पळवून लावण्यासाठी या परिचारिका खूप उत्तम काम करत आहेत. या सर्व परिचारिकांचा आणि त्यांच्या कुटूंबियाचा मी त्यांत आभारी आहे" असे पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. Happy International Nurses Day 2020 Greetings: 'वर्ल्ड नर्स डे' च्या शुभेच्छा मराठी Wishes, Messages, GIFs च्या माध्यमातून शेअर करून निस्वार्थी रूग्णसेवा देणार्या प्रत्येक परिचारिकेला करा सलाम!
International Day of the Nurse is a special day to express gratitude to the phenomenal nurses working round the clock to keep our planet healthy. Presently, they are doing great work towards defeating COVID-19. We are extremely grateful to the nurses and their families.
— Narendra Modi (@narendramodi) May 12, 2020
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांची शु्श्रूषा केली होती. याआधी आणि यानंतर सुद्धा त्यांनी आपले संपूर्ण जीवन रुग्णांची शु्श्रूषा करण्यात अर्पण केले. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन (International Nurse Day) म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगभरावर कोरोनाचे संकट असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज सर्वांच्या लक्षात येत आहे. अशा वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पण मूळ वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी परिचारिका म्हणून काम करण्यात पुन्हा सुरुवात केली आहे.