Photo Credit- X

Birds React to Earthquake: अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये(Earthquake In Northern California) गुरुवारी झालेल्या भूकंपानंतर अधिकाऱ्यांनी प्रथम सुनामीचा इशारा दिला पण काही वेळाने तो रद्द केला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, ओरेगॉन सीमेजवळील हम्बोल्ट काउंटीमधील फर्न्डेल या छोट्या शहराच्या पश्चिमेला सकाळी 10:44 वाजता भूकंप झाला. भूकंपाची अनेक दृश्ये समोर आली आहेत. मात्र,आता भूकंपाचा पक्षांवर (Birds)कसा परिणाम होतो हे दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. भूकंपाचे धक्के जोरात जाणवू लागताच पक्षांचे थवेच हवेत उडले.

जमिनीवरील सर्व पक्षांनी हवेत झेप घेतली. आभाळात पक्षांची एकच गर्दी झली होती. ही दृश्ये जणू बीग बजेट सिनेमाला मागे टाकतील अशी होती. मिळालेल्या माहितीनुसार, सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. लोकांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, त्यांना एकापाठोपाठ एक असे अनेक धक्के जाणवले. सर्व वाहतूक थांबली होती.(हेही वाचा:Earthquake in Gujarat: गुजरातमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; अहमदाबाद, गांधीनगरसह जवळपासची शहरे हादरली)

भूकंप का होतो?

पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा ते घासतात. जेव्हा ते एकमेकांवर चढतात किंवा त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा जमीन थरथरू लागते. याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्युड स्केल म्हणतात. रिश्टर तीव्रता स्केल 1 ते 9 पर्यंत आहे.

भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रस्थानावरून मोजली जाते. म्हणजे त्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा या स्केलवर मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा बाहेर येत आहे. 9 म्हणजे सर्वोच्च. अतिशय भयावह आणि विनाशकारी लहर. दूर जाताना ते कमजोर होतात. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 असेल तर त्याच्या सभोवतालच्या 40 किलोमीटरच्या त्रिज्येत जोरदार धक्का बसतो.