Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake in Gujarat: गुजरात (Earthquake) मध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (National Center for Seismology) नुसार, गुजरातमधील मेहसाणा (Mehsana) येथे रात्री 10.15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किमी खाली होता. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपामुळे मेहसाणा आणि परिसरात घबराट पसरली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक लोक घराबाहेर पडले. गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगरमध्येही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. अहमदाबादच्या वडज, अंकुर, न्यू वडज आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक लोकांनी भूकंपाची माहिती दिली. मेहसाणासोबतच पाटण, बनासकांठा, पालनपूर, साबरकांठासह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना भूकंपाची तीव्रता जाणवली. (हेही वाचा - Nanded Earthquake: नांदेड मध्ये जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के; हदगाव तालुक्यातील सावरगाव ठरले केंद्र)

राजस्थान आणि मध्य प्रदेशात जाणवली भूकंपाची तीव्रता -

दरम्यान, गांधीनगरमधील राज्य नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. गुजरातसोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागातही भूकंपाची तीव्रता जाणवली. गुजरात सीमेजवळील राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. (हेही वाचा - Earthquake in Bay of Bengal: बंगालच्या उपसागरात भूकंप; 5.1 रिश्टर स्केलवर जाणवले हादरे)

गेल्या 200 वर्षांत गुजरातमध्ये 9 मोठे भूकंप -

गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (GSDMA) दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 200 वर्षांत राज्याला नऊ मोठे भूकंप झाले आहेत, ज्यात कच्छ जिल्ह्यात 26 जानेवारी 2001 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपाचा समावेश आहे. तत्पूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू लखपतच्या उत्तर-ईशान्येस 53 किलोमीटर अंतरावर होता. तसेच 27 ऑक्टोबर रोजी राज्याच्या सौराष्ट्र भागातील अमरेली जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.