Earthquake

Earthquake in Bay of Bengal: बंगालच्या उपसागराला १ सप्टेंबरची सकाळ हादरवून सोडणारी ठरली. उपसागरात(Bay of Bengal) 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने त्याबाबतची माहिती दिली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. बंगालच्या उपसागराशिवाय, पूर्वी भागात भूकंपाचे(Earthquake) धक्के जाणवले. नागालँडमध्ये सकाळी 3:36 च्या सुमारास 3.3 तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नोकलक टाउन येथे हा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सकाळी 3:36 च्या सुमारास नोकलक भागात 10 किलोमीटरच्या खोलीत होता. (हेही वाचा: Portugal Earthquake: पोर्तुगाल ची राजधानी Lisbon मध्ये 5.4 रिश्टल स्केलचा भूकंप)

5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के