Farmers Protest: शेतकरी आंदोलनात फूट; VM Singh, Bhanu संघटनेची आंदोलनातून तात्काळ माघार घेत असल्याची घोषणा
VM Singh | Photo Credits: Twitter/ ANI

सिंधू बॉर्डरवर मागे 60 दिवसांपासून शांतपणे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल लाल किल्ल्यावरील हिंसाचाराने गालबोट लागलं आणि आज या आंदोलनात आता फूट पडताना दिसत आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच व्ही एम सिंह (VM Singh)  यांची राष्ट्रीय किसान मजदूर संंघटना शेतकरी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा  राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचा निर्णय आहे AIKSCC (All India Kisan Sangharsh Coordination Committee) नाही असं स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी  कालच्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. आम्ही काहींच्या दिशा या भलत्याच असल्याचं सांगत त्यांना आमच्या शुभेच्छा पण आम्ही बाहेर पडत आहोत असं स्पष्ट केले आहे.

दरम्यान व्ही एम सिंह यांनी बोलताना, भारताच्या झेंड्याला एक प्रतिष्ठा आहे. ती जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र ज्यांनी त्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तो चूकीचा आहे आणि ज्यांनी हे कृत्य करायला दिलं ते देखील चूकीचे आहे. कालच्या हिंसाचारात ITO परिसरात एक जण शहीद झाला. ज्याने त्याला प्रवृत्त केलं त्याच्या विरूद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भावना वी.एम. सिंह यांनी बोलून दाखवली आहे. Red Fort Violence: Deep Sidhu सोबत कोणताही संबंध नाही, Sunny Deol सह काही शेतकरी नेत्यांनी केलं स्पष्ट

ANI Tweet

भानू ची देखील माघार

चिल्ला बॉर्डर वर भारतीय किसान युनियन संघटना आंदोलन करत होती. आता त्यांनी आपलं आंदोलन संपल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आतापर्यंत 2 संघटनांनी या शेतकरी आंदोलनातून माघार घेतली आहे. दरम्यान मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही नवे कायदे रद्द व्हावेत अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.