सध्या ऑनलाईन गेमिंग (Online Game) मधील प्रसिद्ध पबजी (PUBG) गेमचे युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच पबजी गेमचा अतिवापर हा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे माहिती असून ही तो गेम मोठ्या प्रमाणात तरुणाईमध्ये खेळला जात आहे. परंतु पबजीच्या नादामुळे अनेकांनी त्यांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे तर कोणी स्वत:च्या पालकांची हत्या केली असल्याची धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे आता ही असाच एक प्रकार विशाखापट्टणम (Vishakhapatnam) येथे घडला असून दहावीच्या विद्यार्थ्याने पबजी खेळण्यास पालकांनी नकार दिल्याने त्याचे आयुष्य संपवले आहे.
लोहित असे तरुणाचे नाव असून तो परिवारातील एकूलता एक मुलगा आहे. लोहित याला पबजी खेळण्याची प्रचंड सवय लागली होती. त्यामुळे तो अन्य दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करण्यास तयार होत नसे. यावरुन पालकांनी लोहित याला ओरडा सुद्धा दिला होता. अभ्यास करण्याच्या वयात पबजीचे वेड लागल्याने पालकांनी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला. पालकांच्या या वागण्यामुळे नाराज झालेल्या लोहितने आत्महत्या केली आहे.
पालकांनी त्याचे जीव वाचवण्यासाठी उपचारासाठी त्याला रुग्णालयात ही दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तेथे गेल्यावर मृत घोषित केले. त्यामुळे आता शवविच्छेदनाचे रिपोर्ट्स आल्यावर हा अपघाती मृत्यू आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.(पतीच्या 'Pubg' खुळापायी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न)
तर दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाने ही त्याच्या वडिलांनी त्याला पहाटेपर्यंत पबजी गेम खेळताना पाहिले. त्यानंतर वडिलांनी त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागात तरुणाने वडिलांना स्वयंपाक घरात नेऊन त्यांचे विळीने हात पाय कापले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.