Virender Sehwag And Wife Aarti Sehwag (Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याची पत्नी आरती सेहवाग हिने फसवणूक झाल्याप्रकरणी आपल्या बिझनेस पार्टनर विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. व्यवसायातील भागीदारांनी खोट्या सह्या करुन तब्बल साडेचार कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप करत आरतीने ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडे केलेल्या आरोपानुसार दिल्लीतल्या अशोक विहारमध्ये राहणाऱ्या रोहित कक्कडसोबत आरतीची व्यावसायिक भागिदारी होती. रोहित कक्कड आणि त्याच्या काही जवळच्या लोकांनी आपल्याला विश्वासात न घेता एका बिल्डर फर्मशी संपर्क केला. तसेच वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग आमच्यासोबत बिझनेस पार्टनर आहेत असे सांगून त्यांच्या नावावर साडेचार कोटी रुपये कर्ज घेतले होते.

आरती सेहवाग यांनी पोलिसांकडे तक्रार करताना, "रोहित आणि माझी जेव्हा व्यावसायिक भागिदारी झाली तेव्हा मला कल्पना दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे जाणार नाहीत हे मी स्पष्ट केलं होतं. मात्र या साडेचार कोटींच्या कर्जाबाबत मला काहीही माहित नाही. यासाठी माझ्या खोट्या सह्याही करण्यात आल्या आहेत "असे आरोप लगावले होते. धक्कादायक! एका वर्षात बँकांची तब्बल 71,500 कोटींची फसवणूक, RBI ची माहिती; नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांची नावे आघाडीवर

ANI ट्विट

दरम्यान, याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या EOW सेलतर्फे आरोपींवर आयपीसी कलम 420 अंतर्गत, फसवणुकीचा आरोप लगावण्यात आला आहे.