Violations of Flight Norms: विमान प्रवासादरम्यान फोटोग्राफी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला 2 आठवड्यांपर्यंत प्रवासाची परवानगी नाही: DGCA
DGCA Logo (Photo Credits: ANI)

कर्मशियल फ्लाईट्सच्या (Commercial Flights) नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशाला दोन आठवड्यांसाठी त्या मार्गावरुन प्रवास करता येणार नाही, असे आदेश नागरी उड्डाण संचालनालयाने आज (शनिवार, 12 सप्टेंबर) दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात एअरलाईन्स (Airlines) कारवाई करत नाही तोपर्यंत निलंबन लागू राहील, असेही DGCA  (Directorate General of Civil Aviation) कडून सांगण्यात आले आहे. (Flying Rules for Passengers: विमान प्रवासात मास्क न घातल्यास 'No-Fly List' मध्ये होणार प्रवाशांची नोंद)

DGCA ने आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले की, कोणत्याही प्रवासाने अधिनियम 1937 चे नियम 13 चे उल्लंघन केल्यास त्या विशिष्ट मार्गासाठी प्रवाशाची सेवा त्याच्या पुढील दिवसापासून दोन आठवड्यांसाठी निलंबित केली जाईल. कर्मिशयल फ्लाईटमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी असणाऱ्या अटीसंबंधित नियामांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. विमानात पहिल्यापासूनच फोटोग्राफी निलंबित केली आहे. मात्र अनेक कंपन्या हा नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थ ठरल्या असल्याचे Aviation Regulator ने म्हटले आहे. (Media Frenzy on Kangana Ranaut's Flight: कंगना रनौतच्या विमान प्रवासावेळी फ्लाईटमध्ये रिपोर्टर्सचा गोंधळ; DGCA ने Indigo कडे मागितला अहवाल)

ANI Tweet:

बुधवारी 9 सप्टेंबर रोजी चंदीगढ हून मुंबईला परतणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विमान प्रवासादरम्यान झालेल्या फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या गोंधळानंतर इंडिगोची नवी गाईडलाईन समोर आली. या नव्या गाईडलाईननुसार, एअरक्रॉफ्ट नियमांच्या नियम 13, 1937 नुसार कोणत्याही व्यक्तीस विमानात फोटो काढण्यास मनाई आहे. विमानात फोटो काढायचे असल्यास सिव्हील एव्हिएशन डिपार्टमेंटच्या डायरेक्टर जनरल किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज आहे. विमान उड्डाण आणि लँडिंग दरम्यान कोणालाच फोटो काढण्याची परवानगी नाही.