9 सप्टेंबर 2020, हा इंडिगो एअरलाइन्ससाठी (IndiGo Airlines) एक व्यस्त दिवस होता, कारण कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा विमान उड्डाण घेणार होते. तसेच याच विमानातून पद्मश्री कंगना रनौतही (Kangana Ranaut) चंदीगडहून मुंबईला प्रवास करणार होती. तर या विमानाने उड्डाण घेतले आणि मीडियाने कंगनाचा पाठलाग करायला सुरुवात केली. या उड्डाणादरम्यान विमानात अनेक मिडियाचे लोक होते. या लोकांच्यामुळे विमानात माजलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता Directorate General of Civil Aviation ने घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोकडे जाब मागितला आहे. या व्हिडिओंमधून दिसत आहे की, फ्लाईटमध्ये अनेक मीडिया संस्थांचे कर्मचारी हजर आहेत व ते कशाचाही विचार न करता त्यांचे रिपोर्टिंग करत आहेत.
सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीचे भान न ठेवता, सामाजिक अंतराचे पालन न करता हे लोक विमानात गोंधळ घालत आहेत. यामधील काही लोकांनी तर चेहऱ्यावर मास्क देखील लावला नाही. डीजीसीएने इंडिगोच्या फ्लाइट 6E-264 मध्ये मीडिया कर्मचार्यांकडून सुरक्षा आणि सामाजिक अंतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, तसेच विमान प्रवासादरम्यान फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यात आल्याबाबत कंपनीकडे अहवाल मागितला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर नियामक मंडळाने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
एएनआय ट्वीट -
Directorate General of Civil Aviation seeks a report from IndiGo airlines on photography and videography during Kangana Ranaut's flight from Chandigarh to Mumbai on September 9 pic.twitter.com/pMRAvV9GUC
— ANI (@ANI) September 11, 2020
बुधवारी चंदीगड-मुंबई विमानामध्ये कंगना रनौत पुढच्या रांगेत बसली होती. त्याचवेळी अनेक मीडियाच्या लोकांनीही त्याच विमानातून प्रवास केला. नागरी उड्डयन मंत्रालयाने 25 मे रोजी सामाजिक अंतर राखण्यासाठी नियम जारी केला. मात्र या विमानामध्ये सर्व नियम धुडकावून लावण्यात आले होते. आता याबाबत विमान कंपनीला उत्तर देणे भाग आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले जाणार नाही, VHP चा निर्णय)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत व महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये चाललेला वाद चिघळत चालला आहे. मुंबईचा उल्लेख ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ असा केल्याने कंगनावर खूप टीका झाली. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी कंगना मुंबईमध्ये परत आली. यावेळी मुंबई विमानतळावरही कंगणाचे समर्थक व विरोधक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र कंगना मुंबई पोलीस व केंद्त्र सरकारने पुरवलेल्या सुरक्षेसह सुखरूप आपल्या घरी पोहोचली.