Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकट काळात प्रवासी मास्क न घालता कोविड-19 (Covid-19) च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांची नो-फ्लाय लिस्ट (No-Fly List) बनवण्याची सूचना नागरी उड्डाण महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) सर्व एअरलाईन्सला दिल्या आहेत. या नव्या नियमांनुसार, मास्क घालण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याचे अधिकार सर्व एअरलाईन्सला देण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, एअरलाईन क्रु मेंबर्सशी संवाद करुन त्या प्रवाशाच्या वर्तवणूकीवरुन त्याला किती वेळ प्रवास करु दिला जाणार नाही हे ठरवण्यात येईल. (कोविड-19 संकटात विमानातील जेवण, मनोरंजनाच्या सेवा सुरु करण्यास सरकारची परवानगी)

DGCA च्या नव्या नियमांनुसार, सर्व एअरलाईन्स विचारविनिमय करुन नियम मोडणाऱ्या प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकू शकतात. त्याचप्रमाणे इतर एअरलाईन्स देखील त्या प्रवाशाचे नाव नो-फ्लाय लिस्टमध्ये घालू शकतात. भारतातील देशांतर्गत विमानसेवा ही कोविड-19 संकटामुळे दोन महिने बंद होती. त्यानंतर 25 मे रोजी पुन्हा विमानसेवा सुरु करण्यात आली. तेव्हा सर्व एअरलाईन्सना केवळ 45% देशांतर्गत विमानसेवा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

ANI Tweet:

कोरोना व्हायरसच्या या संकट काळात देशांतर्गत विमानसेवेत जेवण देण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तर आंतरराष्ट्रीय विमानसेवेमध्ये विमान प्रवासाच्या कालावधीनुसार पॅक फूड आणि स्नॅक्स देण्यास परवानगी देण्यात आली होती. गुरुवारी नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, देशांतर्गत विमानसेवेमध्येही पॅक फूड, स्नॅक्स, पेय देण्याची परवानगी देण्यात आली आहे.