Rajnath Singh And Amit Shah (Photo Credits: PTI)

पाकिस्तानवर भारतीय लष्करी सेनेच्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 16 डिसेंबर 1971. 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत- पाकिस्तान युद्धामध्ये मोठा विजय मिळवत पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन तुकडे करत पूर्व पाकिस्तान हा देश बांग्लादेश म्हणून अस्तित्त्वात आला. आजच्याच दिवशी बांग्लादेश मध्ये बिजॉय दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. दरम्यान या युद्धामध्ये भारतीय जवानांनी दाखवलेलं शौर्य, अदम्य विश्वास आणि आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वीर जवानांना आजच्या दिवशी नमन केलं जातं. भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, आमदार रोहित पवार, अमित देशमुख यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी, समान्य जनतेने भारतीय जवानांना सलाम केला आहे. ट्वीटर वर त्या निमित्ताने खास शुभेच्छापत्र शेअर करण्यात आली आहेत. Vijay Diwas 2020 Wishes: 1971 'विजय दिवसा'निमित्त Wallpapers, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून Quotes शेअर करून करा जवानांना नमन.

अमित शाह

राजनाथ सिंह

रोहित पवार

अमित देशमुख

राहुल गांधी

3 डिसेंबर 1971 दिवशी भारत सरकारने पाकिस्तान विरूद्ध युद्ध छेडले होते. त्यानंतर पाकिस्तान चे लष्कर जनरल अयुब खाब यांच्या अत्याचारातून पूर्व पाकिस्तानच्या लोकांची मुक्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पाकिस्तान विरूद्ध सुमारे 13 दिवस युद्ध सुरू होते. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेना कोणत्याही अटी शर्ती शिवाय आत्मसमर्पणासाठी पुढे आली आणि हे युद्ध संपलं.

यंदा या भारत-पाकिस्तानच्या 71 सालच्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान 'Swarnim Vijay Mashaal'प्रज्वलित करणार आहेत.