Mahapurush Vs Yugpurush: महात्मा गांधी
Jagdeep Dhankhar (Photo Credit - X)

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद रंगण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रपीता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना केली आहे. गांधी हे मागच्या शतकातील महापुरुष (Mahapurush) होते तर मोदी हे या शतकातील युगपुरुष (Yugpurush) असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांची थेट तुलना महात्मा गांधी यांच्याशी केल्यामुळे देशभरातील विरोधक आणि गांधीवादी मंडळींकडून उपराष्ट्रपतींच्या विधानावर जोरदार चर्चा होत आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याचा व्हिडिओ उपराष्ट्रपतींच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

' महात्मा गांधी हे पाठिमागच्या शतकातील महापूरुष'

जगदीप धनखर यांनी आपल्या एक्स हँडलवरुन केलेल्या हिंदी पोस्टाच मराठी भावार्थ असा की, 'मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो. महात्मा गांधी हे पाठिमागच्या शतकातील महापूरुष होते. नरेंद्र मोदी या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांपासून आपल्याला सुटका मिळवून दिली. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला त्याच प्रगतिच्या रस्त्यावर आणले. जे आपण सदैव पाहू इच्छितो'.  (हेही वाचा, Vice President Candidate: शेतकऱ्याच्या मुलापासून ते राज्यपालापर्यंतचा प्रवास, जाणून घ्या कोण आहेत उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखर)

 जैन धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात वक्तव्य

उपराष्ट्रपती हे जैन धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. धनखर यांनी श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे अनावरणही या वेळी केले. श्रीमद राजचंद्रजी यांचा जन्म गुजरातमध्ये 1867 मध्ये झाला आणि 1901 मध्ये मृत्यू झाला. ते जैन धर्मावरील शिकवणी आणि महात्मा गांधी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी ओळखले जातात. 'राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांनी श्रीमद राजचंद्रजींच्या संदर्भात चिंतन केले आहे,' असेही धनखर म्हणाले.

व्हिडिओ

 संजय राऊत यांनी जोरदार टीका

उपराष्ट्रपतींच्या विधानावरुन शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, " तुमच्या शब्दावर 2024 नंतरही ठाम राहा. कोण 'पुरुष', 'महापुरुष' की 'युगपुरुष' हे आम्ही ठरवत नाही, इतिहास, शतके आणि जगभरातील लोक हे ठरवतात. महात्मा गांधींना साऱ्या जगाने पूज्य केले होते.. सरकारमध्ये बसणारेही 'पुरुष' असते तर जम्मू-काश्मीरमध्ये रोज आपले जवान शहीद झाले नसते, चीन लडाखमध्ये घुसला नसता..", असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

व्हिडिओ

दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदींवरील धनखर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आश्चर्य व्यक्त केले, “मी उपराष्ट्रपतींना विचारू इच्छितो की, एका विशिष्ट समुदायाचा चुकीच्या आणि गैरअर्थाने उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांच्या पक्षाच्या खासदाराला स्वातंत्र्य देऊन कोणत्या नवीन युगाची सुरुवात झाली?