Motilal Vora | (Photo Credits- ANI)

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचे निधन (Veteran Congress Leader Motilal Vora Passes Away) झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्याने ते गेले प्रदीर्घ काळ त्रस्त होते. काल (रविवार, 20 डिसेंबर) त्यांना एस्कॉर्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. हृदयस्पर्षी गोष्ट अशी की कालच त्यांचा वाढदिवस होता. मोतीलाल वोरा (Motilal Vora ) हे प्रदीर्घ काळापासू काँग्रेस (Congress ) पक्षाचे खजीनदार राहिले. त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.

मोतीलाल वोरा हे गांधी कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. ते प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षाचे खजीनदार होते. परंतू, वाढते वय आणि वार्धक्य याचे कारण देत तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोतीलाल वोरा यांच्याकडील खजीनदार पदाचा कार्यभार काढून तो अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान, अहमद पटेल यांचेही काही दिवसांपूर्वीच निधन झाले. या दोन्ही नेत्यांचे जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानले जात आहे. (हेही वाचा, Ahmed Patel Passes Away: जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन, कोरोना व्हायरस संसर्गामुळे वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

मोतीला वोरा यांचा जन्म 20 डिसेंबर 1927 या दिवशी जोधपूर (तेव्हाच्या ब्रिटिश इंडियाच्या राजपुताना एजन्सी आणि आजच्या राजस्थान येथील नागौर ) येथील निंबी जोधा जोधपूर येथे झाला. ते पुष्करणा ब्राह्मण परिवारातून येत. त्यांचे शिक्षण रायपूर आणि कोलकाता येथे झाले. ते हाडाचे पत्रकार होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी काम केले. त्यांचा विवाह शांतीदेवी यांच्याशी झाला. त्यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा अरुण वोरा हे छत्तीसगड येथील दुर्ग येथून विधानसभेवर आमदार आहेत.