काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन (Ahmed Patel Passes Away ) झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. अमहद पटेल (Ahmed Patel ) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. 15 नोव्हेंबर या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली स्थित गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात (Medanta hospital) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज (25 नोव्हेंबर 2020) पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. अहमद पटेल यांचे चिरंजीवर फैसल पटेल (Faisal Patel) यांनी टविट करुन ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, अहमद पटेल यांच्यावर याच रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
फैसल पटेल यांनी ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, अत्यंत दु:खी आणि खिन्न मनाने अहमद पटेल यांच्या आकस्मिक मृत्यूची घोषणा करत आहे. फैसल पटेल यांनी म्हटले आहे की, 25 तारखेला सकाळी 3.30 वाजता त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. साधारण एक महिन्यापूर्वी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. उपचारादरम्यान त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यामुळे मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा, Ahmed Patel Admitted in ICU: ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमत पटेल यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, अतिदक्षता विभागात उपचार सुरु)
फैसल पटेल यांनी नागरिकांना अवाहन केले आहे की, कोरोना व्हायरस संसर्गाशी संबंधीत सर्व नियम, अटी, व संकेत (प्रोटोकॉल) यांचे पालन करावे. कोणत्याही प्रकारची गर्दी होईल, असे वर्तन करु नये.
@ahmedpatel pic.twitter.com/7bboZbQ2A6
— Faisal Patel (@mfaisalpatel) November 24, 2020
अहमद पटेल हे काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते प्रदीर्घ काळ सल्लागार राहिले. काँग्रेस हा एक देशातील सर्वात जुना पक्ष आहे. अशा पक्षाला सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम पटेल गेली अनेक वर्षे करत आले आहेत. गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या आणि अत्यंत संवेदनशील गोष्टींची माहिती असणाऱ्यांपैकी एक नेते अशी त्यांची ओळख होती. सांगितले जाते की, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या निधनानंतर अहमद पटेल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच सोनिया गाधी भारतीय राजकारणा आणि प्रामुख्याने काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झाल्या. काँग्रेस पक्षातील तत्कालीन नेते पी.व्ही. नरसिंह राव यांच्याशी मतभेद होऊनही सोनिया गांधी यांचे काँग्रेसमधील स्थान बळकट राहिले. राहुल गांधी हे सुदधा अनेकदा अहमद पटेल यांचाच सल्ला घेतात असे सांगितले जायचे.
अहमद पटेल यांनी महानगरपालिका निवडणुकांपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. पुढे ते पंचायत समिती सभापती बनले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला आणि ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लावण्यात आलेल्या 1977 च्या आणिबाणीनंतर काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. परंतू, त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसाल मोठा विजय मिळाला. या विजयात अहमद पटेल लोकसभेवर पहिल्यांदा निवडूण गले. तेव्हापासून ते 1977, 1980,1984 असे तीन वेळा लोकसभेवर निवडूण आले. ते तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. 1993,1999, 2005, 2011, 2017 पासून आजतागायत ते राज्यसभेवर काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.
I have tested positive for Covid19. I request all those who came in close contact with me recently, to self isolate
— Ahmed Patel (@ahmedpatel) October 1, 2020
अहमद पटेल यांनी 1 ऑक्टोबर रोजी केरोना संक्रमित झाल्याची माहिती स्वत:च ट्विट करुन दिली होती. तेव्हा पटेल यांनी म्हटले होते की, माझी कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी सर्वांना अवाहन करतो की, जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ची कोरोना व्हायरस चाचणी करुन घ्यावी. गरज पडल्यास क्वारंटाईन व्हावे.