वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली लेकीच्या लग्नाचे आमंत्रण धाडणाऱ्या रिक्षा चालकाची भेट
Narendra Modi Meets Auto Driver Mangal Khevat (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर असताना रविवारी एका रिक्षाचालकांची खास भेट घेतली, हे रिक्षाचालक म्हणजे काही दिवसांपूर्वी मोदींना आपल्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका पाठवणारे मंगल खेवट (Mangal Khevat) . 8 फेब्रुवारी रोजी खेवट परिवाराच्या वतीने नरेंद्र मोदी यांना 12 फेब्रुवारी रोजी असणारया लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले होते. मात्र कामात व्यस्त असल्याने मोदींना प्रत्यक्ष हजेरी लावणे शक्य झाले नाही, मात्र याच लग्न सोहळ्याच्या नंतर वाराणसी दौऱ्यावर असताना त्यांनी मंगल यांना आपल्या कार्यलयात बोलावून त्यांची खास भेट घेतली तसेच, समारंभाविषयी, मुलगी व परिवाराविषयी विचारपूस देखील केली. मोदींच्या या प्रेमळ कृतीमुळे मंगल यांनी भावुक होऊन आभार मानले. ANI या वृत्तसंस्थेकडून या भेटीचे फोटो आज शेअर करण्यात आले आहेत. वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या 63 फुटी पुतळ्याचे अनावरण

प्राप्त माहितीनुसार,मंगल खेवट यांच्या मुलीचं लग्न 12 फेब्रुवारी रोजी पार पडले याआधी आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मंगल खेवट दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयात गेले होते. पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे खेवट यांनी निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली होती. या वर उत्तर देत 8 फेब्रुवारीला मोदींनी मंगल खेवट यांना पत्र पाठवत मुलीला आशीर्वाद देत अभिनंदन केलं होते. यांनतर रविवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसीच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वाराणसीतल्या मंगल खेवट या रिक्षा चालकाची भेट घेतली.

ANI ट्विट

दरम्यान, खेवट हे काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नसून त्यांनी पर्यावरण स्नेहापोटी आणि मोदींच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रभावित होऊन खेवट यांनी गंगा नदी किनारा स्वच्छ करायची मोहिम हाती घेतली आहे. मोदींनी भेटीदरम्यान खेवट यांच्या स्वच्छतेच्या धोरणावरुन कौतुक केले.