Uttarakhand: जातीयवादाचा बळी, लग्नाच्या पंगतीत उच्च वर्णीय तरुणांनी केलेल्या मारहाणीने 21 वर्षीय दलित तरुणाचा मृत्यू
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

लग्नाच्या पंगतीत उच्च वर्णीयांच्या (Upper Caste Youth)  समोर खुर्चीत बसून जेवणाऱ्या दलित तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उत्तराखंड (Uttarakhand) येथील डेहराडून (Dehradun) येथे पाहायला मिळाली आहे. काहीच दिवसांपूर्वी तेहरी गढवाल (Tehri Garwhal) जिल्ह्यातील श्रीकोट (Shreekot) परिसरात एका लग्नात काही उच्च जातीच्या तरुणांनी या 21 वर्षीय 'जितेंद्र दास' (Jitendra das) या दलित तरुणावर (Dalit Youth) हल्ला करत जबर मारहाण केली, त्यानांतर दुसऱ्या दिवशी त्याला डेहराडून मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा लगेचच मृत्यू झाला. हिंदुस्तान टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणाऱ्या सात तरुणांच्या विरोधात दलित तरुणाच्या बहिणीने केलेल्या तक्रारीनुसार 29 एप्रिलला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र अद्याप यापैकी कोणालाही पोलसांनी अटक केलेली नाही.

श्रीकोट जवळ राहणारा जितेंद्र दास हा सुतारीचे काम करून संपूर्ण घराचा खर्च एकटाच उचलायचाया, काही दिवसांपूर्वी एका दूरच्या नातलगाच्या लग्नात जितेंद्र आपल्या कुटुंबासोबत गेला होता. यावेळी इतर सर्व समारंभात व्यस्थ असताना जितेंद्र एकटाच जेवणासाठी गेला. जितेंद्रला खुर्चीवर बसून जेवत असताना पाहून तिथल्या उच्च जातीय तरुणांना राग आला व त्यांनी जेवणाच्या ताटासकट जितेंद्रला लाथ मारून खाली पाडले, दलित असूनही खुर्चीवर बसण्याची हिंमत कशी झाली असा दूषित प्रश्न करत या तरुणांनी जितेंद्रला मारायला सुरवात केली, इतकंच नव्हे तर घरी परत जात असताना देखील पुन्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला अशी माहिती हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या जितेंद्रच्या मित्राने माध्यमांना दिली.

दिल्ली: स्वार्थासाठी जोडप्याकडून निष्पाप उबर ड्रायव्हरची हत्या; मृतदेहाचे तुकडे नाल्यात फेकले

या मारहाणीत जखमी झालेला जितेंद्र घरी गेल्यावर कोणाला काही न सांगता थेट झोपून गेला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यावर त्याच्या आईने सर्वाना बोलावून घेतले,त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे पोहचताच जितेंद्रचं मृत्यू झाल्याचे समोर आले. जितेंद्रच्या डोक्यावर व गुप्त अवयवांवर या हल्य्यामध्ये इतका जबर मार लागला होता की त्याला धड घरी पोहचणे देखील कठीण होते, असे सांगत त्याच्या चुलत भावाने या घटनेची पुष्टी केली.