पीलीभीत येथील एका 36 वर्षीय महिलेने कथित रुपात जानेवारी महिन्यात आपल्या नवऱ्याचा बनावट पासपोर्ट बनवला. ऐवढेच नाही तर पासपोर्ट बनवल्यानंतर प्रियकरासोबत ऑस्ट्रेलियात फिरायला सुद्धा गेली. अशा पद्धतीच्या विचित्र घटनेचा दावा नवऱ्याने केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दोघ मार्च महिन्यात परतणार होते. परंतु भारतात सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने ते लोक तेथेच फसले. त्यानंतर 24 ऑगस्टला परतले आहेत. दामगढी गावातील निवासी आणि मुंबईत काम करणाऱ्या महिलेच्या नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याची पत्नी आणि संदीप सिंह नावाच्या व्यक्तीसोबत तिचे अवैध संबंध असल्याचे नवऱ्याने म्हटले आहे.
नवऱ्याने पुढे असे ही म्हटले आहे की, बायकोने प्रियकरासोबत ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी माझ्या कागदपत्रांचा वापर करुन बनावट पासपोर्ट बनवला. या दापंत्यांचा एक मुलगा ऑस्ट्रेलियात शिकतो. पोलीस अधिक्षक जय प्रकाश यादव यांनी नवऱ्याची प्राथमिक रुपात तक्रार दाखल केली आहे. तसेच एलआययू अंतर्गत या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. तक्राकर्त्यानुसार, तो गेल्या 20 वर्षांपासून मुंबईत काम करत आहे. कधी-कधी बायकोला भेटण्यासाठी येतो. जी फार्महाउस येथे राहून वडिलोपार्जित जमिनीची देखभाल करते.(बिहार: आईवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार, मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून नराधमांचे कृत्य, व्हिडिओ व्हायरल)
नवऱ्याने असे म्हटले की, जेव्हा मी 18 मे रोजी पीलीभीत येथे परतलो त्यावेळी माझी पत्नी घरी नव्हती. संदीप याच्या परिवाराने असे म्हटले की, ते दोघे ऑस्ट्रेलियात होते. तर नवऱ्याने संदीप याने आपले कागदपत्र वापरुन पासपोर्ट बनवला आहे का ते तपासून पाहण्यासाठी त्याने अर्ज सुद्धा केला. यावर संशय खरा निघाला आणि माझ्या नावाने 2 फेब्रुवारी 2019 मध्ये पासपोर्ट काढण्यात आला आहे.
एसपी यांनी पुढे असे सांगितले की, गजरौला पोलिस आणि एलआयू इंस्पेक्टर कंचन रावत तपास करणार असुन तक्रारकर्त्याच्या नावावर पासपोर्ट कसा दिला गेला जे सुद्धा तपासून पाहिले जाणार आहे.