
बिहार (Bihar) राज्यातील मुजफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्यातील करजा (Karja) येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. काही नराधमांनी घरात घुसून एका महिलेवर आळीपाळीने अत्याचार केले आहेत. या वेळी महिलेचा मुलगा घरातच होता. नराधमांनी मुलाच्या डोक्याला बंदून लाऊन पीडितेवर अत्याचार केल्याचे वृत्त आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेऊन पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्टच्या रात्री करजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात पाच नराधम एका विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी पीडितेच्या मुलाच्या डोक्याला बंदुक लावून त्याला ओलीस ठेवले. याचवेळी इतर नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित महिला ही आपल्या मुलासोबत घरी एकटीच राहते. तिचा पती परगावी राहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
पीडितेच्या आरोपानुसार, 22 घॉस्टच्या रात्री आरोपी पुन्हा एकदा पीडितेच्या घरी आले. त्यांनी पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरोपींना पुन्हा असे कृत्य करण्यास विरोध करत आरडाओरडा केला. त्यानंतर नराधम घटनास्थळावरुन पळून गेले. त्यानंतर आरोपींनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा दावा पीडितेने केला आहे. (हेही वाचा, हैदराबाद: एकाच महिलेकडून तब्बल 143 जणांवर अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल)
पीडितेने पुढे म्हटले आहे की, घटनेचा व्हिडिओ जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा मी घटनेची माहिती पतील दिली. त्यानंतर मी आणि पतीने करजा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस उपाधिक्षक राजेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, पीडितेच्या जबाबावरुन करजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. प्राथमिक तक्रारीवरुन पाच जणांना आरोपी करण्यात आल्याचेही कुमार शर्मा यांनी सांगितले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.