![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Sexually-Abused-380x214.jpg)
हैदराबद (Hyderabad) येथून एक धक्कादायक तितकीच विचित्र घटना पुढे येत आहे. येथील एका 25 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे की, 2010 ते आतापर्यंत 143 लोकांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. हैदराबाद येथील नलगोंडा (Nalgonda) जिल्ह्यातील नागरिक असलेल्या या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पुंजागुट्टा पोलीस स्टेशन (Panjagutta Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेने राजकीय पार्श्वभूमी असलेले काही नागरिक, विद्यार्थी नेते, चित्रपट, प्रसारमाध्यमं आणि इतर काही लोकांवर आपल्या तक्रारीत अत्याचाराचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीत काही महिलांचाही समावेश आहे.
तक्रारदार महिलेने 139 जणांची नावे तक्रारीत घेतली आहेत. पुढे या महिलेने म्हटले आहे की, अत्याचार करणाऱ्या लोकांमध्ये आणखी चार लोकांचा समावेश आहे. त्या चारही जणांची नावे तिला सध्या आठवत नाहीत. तक्रारदार महिलेने 20 ऑगस्टला नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर दाखल केला आहे. ज्या महिलेने तक्रारीत दिललेल्या व्यक्तिंची नावे आरोपी म्हणून आहेत.
पोलिसांनी तक्रारदार महिलेला वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी पाठवले आहे. दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महिलेने केलेल्या तक्रारीची सत्यता तपासली जाईल. त्यानंतरच आवश्यक ती कारवाई केली जाईल. (होही वाचा, धक्कादायक! वर्धा येथे अंगणात खेळत असलेल्या दोन अप्लवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत)
हैदराबाद येथील सोमाजीगुडा येथील महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2009 मध्ये लग्नानंतर तीन महिन्यांनी तिचा पती, सासरचे लोक आणि इतर नातेवाईकांनी तिला त्रास देऊन हैराण केले. तिचा शारीरिक छळही केला. पुढे 2010 नंतर महिलेचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती महिला आपल्या आईच्या घरी गेली. तिथे तिने पुढील शिक्षणासाठी एका कॉलेजमध्ये प्रवेश केला.
महिलेने आरोप केला आहे की, तिच्यावर जातीच्या नावाखाली अत्याचार करण्यात आला. हा अत्याचार करताना व्हिडिओही बनविण्यात आला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकीही तिला देण्यात आली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड सिंहिता अंतर्गत येणाऱ्या विविध कायदा आणि कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. नागराजू यांनी म्हटले आहे की, तक्रारीची सत्यता पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.