धक्कादायक! वर्धा येथे अंगणात खेळत असलेल्या दोन अप्लवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
अंगणात खेळत असलेल्या दोन अप्लवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वर्धा (Wardha) येथील सिंदी परिसरात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अंगणात खेळत असलेल्या दोन अप्लवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वर्धा (Wardha) येथील सिंदी परिसरात गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितांचे आई- वडील घरी नसल्याचे संधी साधून आरोपीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या लज्जास्पद कृत्याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील देऊन आरोपी पसार झाला आहे. त्यानंतर पीडितांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
स्नेनल पुरुषोत्तम मून (वय,24) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी आपल्या शेजारी राहणाऱ्या नऊ आणि सात वर्षीय मुलींवर लैगिक अत्याचार केले. तसेच अत्याचार करुन याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याचे धमकी दिली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला होता. मात्र, आई वडील घरी आल्यानंतर पीडितांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती लोकमत ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Four Members Of Same Family Murdered In Nashik: नाशिक हादरले! घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरुन निर्घृण हत्या; नांदगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे पालकवर्गांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच वर्धा येथे घडलेल्या घटनेने यात आणखी भर घातली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2020 10:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

