Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात पाच जणांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एकाला अटक
Representational Image | (Photo Credits: IANS)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सीतापूर जिल्ह्यातून (Sitapur district) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश येथील सीतापूर जिल्ह्यातील इमलिया सुलतानपूर गावात (Imalia Sultanpur Village) एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पाच आरोपींनी नंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर नंतर व्हायरल केला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. व्हायरल व्हिडिओमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की ही घटना 7 सप्टेंबर रोजी इमलिया सुलतानपूर गावात घडली जेव्हा ती मुलगी बाजारातून घरी परतत होती. पोलिसांना मुलीने सांगितले की, आरोपींनी त्यांच्या मोबाइल फोनवरून या गुन्ह्याचा व्हिडिओ बनविला आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली. (बिहार: आईवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार, मुलाच्या डोक्याला पिस्तूल लावून नराधमांचे कृत्य, व्हिडिओ व्हायरल)

त्यानंतर पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. "जवळच्या खेड्यातील शीबू आणि नाझीम या दोन तरुणांनी मुलीला जवळच्या उसाच्या शेतात नेले जेथे तिघेजण पूर्वीच उपस्थित होते आणि सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला," पोलिसांनी सांगितले. दरम्यान आरोपी शीबूला पोलिसांकडून अटक करण्यात असून पोलिस पथके इतरांच्या शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, सीतापूरचे पोलिस अधीक्षक आर. पी. सिंह आणि अतिरिक्त एसपी (दक्षिण) राजीव दीक्षित यांनी या सामूहिक बलात्काराच्या तणावाखाली या गावाला भेट दिली आणि खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली. दुसरीकडे, बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील करजा येथे काही नराधमांनी घरात घुसून एका महिलेवर आळीपाळीने अत्याचार केले आहेत. या वेळी महिलेचा मुलगा घरातच होता. नराधमांनी मुलाच्या डोक्याला बंदून लाऊन पीडितेवर अत्याचार केल्याचे म्हटले जात आहे. घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रकरणाची दखल घेऊन पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.