Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

कोविड-19 (Covid-19) च्या डेल्टा प्लस (Delta Plus) वेरिएंटचे दोन रुग्ण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) देवरिया (Deoria) आणि गोरखपूर (Gorakhpur) येथील आढळून आले होते. त्यानंतर संत कबीर नगर (Sant Kabir Nagar) येथे कप्पा स्ट्रेनचा (Kappa Strain) एक रुग्ण आढळून आला होता. या 66 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. genome sequencing exercise दरम्यान हा स्ट्रेन आढळून आला.

13 जून रोजी या रुग्णाचे सॅपल घेण्यात आले होते. त्यानंतर ते सॅपल CSIR's Institute of Genomics and Integrative Biology कडे पाठवण्यात आले. त्या सॅपलमध्ये कप्पा स्ट्रेन आढळून  आला. दरम्यान, डेल्टा प्लस प्रमाणे कप्पा देखील एक वेरिंएंट म्हणून घोषित करण्यात आला आहे. (Covid-19 Delta Plus ने घेतला पहिला बळी; मध्य प्रदेश मध्ये महिलेचा मृत्यू)

BRD Medical College मधील मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख अमरेश सिंह यांनी सांगितले की, 27 मे रोजी रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर 12 जून रोजी त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. 13 जून रोजी त्यांचे नमूने घेण्यात आले. उपचारादरम्यान 14 जून रोजी रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती, असेही सिंह यांनी सांगितले.

याच काळात राज्यातून 2000 पेक्षा अधिक सॅपल genome sequencing साठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदा डेल्टा प्लस स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकालाही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. याचाच अर्थ व्हायरसचे म्युटेशन राज्यातच झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.