उत्तर प्रदेश: बिटकॉइनमध्ये एका महिन्यात दुप्पट कमाई करुन देईन असे सांगून व्यक्तीला लावला 2 कोटींचा चुना
Bitcoin | Representational Image | (Photo credits: Twitter/hartleyalex51)

युपी (UP) मधील गाजियाबाद मध्ये बिटकॉईनच्या माध्यमातून प्रतिदिनी 35 दिवस नफा मिळवून देण्याची एका व्यक्तीवर भुरळ पाडून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर बहुतांश पीडितांनी त्यांच्या झालेल्या फसवणूकीबद्दल तक्रार केली आहे. या प्रकरणी नंदग्राम आणि कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(फोटो पाठवले नाहीस तर हाताची नस कापण्याची इन्स्टाग्रामवरील मित्राकडून धमकी, १७ वर्षीय मुलीला न्यूड फोटो पाठवण्यासाठी केले ब्लॅकमेल)

नंदग्राम मधील पीडित उपेंद्र याच्यासोबत 1 कोटी 90 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तर कविनगर ठाण्यात नोएडा विकास भवनात तैनात ड्रायव्हर नरेंद्र याला साढे आठ लाखांचा चुना लावला आहे. दोन्ही प्रकरणी नवनीत सांगवान आणि पूजा सांगवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुभम नावरियाचे नाव कविनगरच्या प्रकरणात सामिल गेले आहे.

नवनीत याला मधूबन बापूधाम ठाणे पोलिसांनी काही दिवसांपू्र्वी अटक केली आहे. त्यानंतर त्याने ट्रेनिंग कंपनीच्या नावे लोकांची फसवणूक केल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणी त्याच्या अटकेनंतर सातत्याने बिटकॉइन मध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवलेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.(मध्य प्रदेश: तरुणीच्या गोड बोलण्यात फसले निवृत्त अधिकारी, वाढदिवसाच्या पार्टीदिवशी एकटे गेल्याने गमावले तब्बल 6 लाख)

आटौर नंगला गावात राहणाऱ्या उपेंद्र याने म्हटले की, 2018 मध्ये त्याची ओळख नवनीत सांगवान याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्याने बिटकॉइनच्या ट्रेडिंग बद्दल माहिती दिली. तसेच पैसे दुप्पट होतील असे सुद्धा त्याने म्हटले होते. तसेच सुरुवातीच्या महिन्यात काही पैसे परत सुद्धा दिले. अशातच उपेंद्र याने आपल्या नातेवाईकांसोबत मिळून जवळजवळ 1 कोटी 90 लाख रुपये आरोपीला दिले. पण काही महिन्यानंतर त्याने पैसे परत करणे बंद केले. मार्च महिन्यानंतर पैसे लवकरच देतो असे सांगून आरोपीने पळ काढल्याचे उपेंद्र याने म्हटले आहे.