Mulayam Singh Yadav's Daughter-In-Law To Joins BJP Today: मुलायम सिंह यांच्या सुनबाई अपर्णा सिंह यादव यांचा भाजप प्रवेश, समाजवादी पक्षाला धक्का
Aparna Yadav | (Photo Credit - Twitter/ANI)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022) आता शहकाटशाह आणि फोटोफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. अनेक मंत्री आणि आमदारांनी भाजप (BJP) सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपने आता समाजवादी पक्ष प्रमुखांच्या कुटुंबातच निशाणा साधला आहे. मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्या सुनबाई अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अपर्णा या मुलायम सिंह यांच्या सुनबाई आणि साप सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या छोटे बंधू प्रतीक यादव यांच्या पत्नीआहेत. भाजपने अपर्णा यांचे जोरदार स्वागत केले आहे.

भाजप प्रवेशानंतर अपर्णा यादव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,  मी भाजपची आभारी आहे. माझ्यासाठी देश नेहमीच प्रथम येतो.  मी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे कौतुक करते. दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अपर्ण यादव यांना उद्देशून म्हटले की, 'भाजप परिवारात आम्ही आपले स्वागत करतो आहोत. आम्हाला आनंद वाटतो आहे की, मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई असूनही त्यांनी (अपर्णा) भाजपच्या कामाचे कौतुक केले आहे आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.' दरम्यान, योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक नेत्यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. (हेही वाचा, UP Assembly Election 2022: समाजवादी पक्षाचे भाजपला 'मुलायम' धक्के, योगी सरकारमधील मंत्री धर्म सिंह सैनी यांचा राजीनामा, गळती थांबता थाबेना)

ट्विट

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपर्णा सिंह यादव लखनऊ कैंट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू इच्छित होत्या. या मतदारसंघात त्या काही काळ सक्रियही राहिल्या. मात्र, अखिलेश यादव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला ते तिकीट देणार नाहीत. अगदी शेवटच्या क्षणीही जेव्हा अखिलेश ठाम असल्याचे दिसले तेव्हा त्या नाराज झाल्या. तेव्हापासूनच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. अखेर आज त्यांनी भाजप प्रवेश केला.