उत्तर प्रदेशातील महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना, परिसरात खळबळ
गांधी इंटर कॉलेज (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जालौन जिल्ह्यातील एका महाविद्यालयात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी काही अज्ञात व्यक्तींकडून महाविद्यालयातील गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गांधी इंटर महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गांधीजी यांचा पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून महाविद्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच महात्मा गांधी यांचा पुतळा पुन्हा एकदा सुस्थिती करुन उभारावा आणि या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच आरोपींना अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात करावी असे ही म्हटले जात आहे.('जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल आम्हाला लाज वाटले'; इंग्लंडच्या धर्मगुरूचे स्मारकासमोर क्षमा मागत लोटांगण)

ANI Tweet:

पुतळा तोडण्याच्या प्रकारानंतर महाविद्यालयाच्या परिसरात मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे तातडीने याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. या प्रकारावर वरिष्ठ पोलीस अधिकारी अवधेश सिंह यांनी असे म्हटले आहे की, पुतळ्याची पुन्हा एकदा उभारणी करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.