अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) येत्या 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतात दोन दिवसांचा दौरा असून ते पहिल्या दिवशी अहमदाबाद येथे जाणार आहेत. तसेच आगरा येथील ताजमहालाला सुद्धा भेट देणार आहेत. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून गुजरात सरकारने तर 100 कोटी रुपये यासाठी खर्च केल्याची बाब समोर आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी गरिबांच्या झोपड्या दिसू नये म्हणून भिंत उभारण्यात आल्याचा प्रकार ही उघडकीस आला आहे. पण तरीही ट्रम्प यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात येत आहे. आगरा येथील रस्त्यांवरील भिंतींवर रंगरंगोटी करुन त्या सजवण्यात आल्या आहेत.
खेरिया विमानतळ ते ताज महाल दरम्यान रस्त्यांवरील भिंतींवर डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करणारी चित्रे काढण्यात आली आहेत. तसेच ट्रम्प यांच्या नावाचे विविध स्लोगन्स सुद्धा लिहिण्यात आले आहेत. यामुळे आगराचा परिसर आता कलरफूल झाला असून त्याचे रुप बददले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे ताजमहालाल भेट देणार असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आले आहे. तसेच 'केम छो ट्रम्प' असे या दौऱ्याला नाव देण्यात आले होते. तर डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावयासोबत भारत दौऱ्यावर येणार आहेत.(डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा)
Agra: Walls on the route from Kheria airport to the Taj Mahal are being painted with images of US President Donald Trump and slogans welcoming him, ahead of his visit on 24th February. pic.twitter.com/UsDFzgG3iq
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2020
ट्रम्प यांचा भारत दौरा हा एक व्यापारातील उत्तम डीलच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण मानला जात आहे. तर भारत आणि अमेरिका देशाच्या दरम्यान काही व्यापार संबंध पुन्हा प्रस्थापित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यासाठी फार उत्सुक आहे. पण भारतासोबत एक उत्तम डील करु शकतो असे लास वेगस येथे गुरुवारी म्हटले आहे.