PM मोदी आणि राष्ट्रपति डोनल्ड ट्रंप (File Photo)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) हे भारत दौऱ्यावर येणार असल्याने अहमदाबाद पासून ते आगरा पर्यंत जोरदार तयारी करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील रस्ते सुद्धा सजवण्यात आले आहेत. तर मोटेरा स्टेडिअम येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. याच दरम्यान शुक्रवारी अहमदाबाद विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. तर आज विमानतळाच्या बाहेर मॉक ड्रिल सुद्धा झाले. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सुरक्षितता पाहता अहमदाबाद विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची सुट्टी 24-25 फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. पोलिसांना हे कर्मचारी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान मदत करणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया 24 फेब्रुवारीला वॉशिंग्टन येथून थेट अहमदाबाद येथे येणार आहेत. ट्रम्प यांचे स्वागत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मोटेरा स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी ताजमहालाला भेट देणार आहेत.(अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आगरा येथील रस्त्यांवरील भिंतींवर रंगरंगोटी)

ताजमहालाला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प दिल्लीकडे रवाना होणार आहेत. तेथे 25 फेब्रुवारीला मोदींसोबत काही महत्वाच्या मुद्द्यांवर बातचीत करणार आहेत. तसेच देशातील बड्या उद्योगपतींशीसोबत सुद्धा चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहेत.