 
                                                                 UPSC Recruitment 2021: पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. संघ लोक सेवा आयोगाने मंत्रालयामध्ये भारतीय सूटना सेवाच्या वरिष्ठ ग्रेडच्या पदासाठी 34 रिक्त पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी एक जाहीरात सुद्धा झळकवली आहे. आयोगाच्या भरती द्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार, आयआयएस सीनियर ग्रेड भरतीसह कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाने असिस्टंट डायरेक्टरच्या एकूण 4 रिक्त पद आणि गृह मंत्रालयाने राजभाषा विभागामध्ये रिसर्च ऑफिसरच्या 8 रिक्त पदांवर नोकर भरती केली जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी युपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर देण्यात आलेल्या लिंक खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून जाहीरात डाऊनलोड करता येणार आहे. तेथे तुम्हाला नोकर भरती संदर्भात अधिक माहिती मिळणार आहे. अर्ज करण्यादरम्यान उमेदवारांना 25 रुपयांचा शुल्क सुद्धा भरावा लागणार आहे. त्याचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे असे सांगण्यात आले आहे.(SBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज)
भारतीय सूचना सेवा सिनियग ग्रेडसाठी इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/संस्थेतून पत्रकारिता/जनसंचारमध्ये डिप्लोमा/पीजी डिप्लोमा केलेला असावा. त्याचसोबत पत्रकारिता, प्रचार किंवा जनसंपर्कमध्ये 2 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय 30 वर्ष असावे असे सांगण्यात आले आहे.
असिस्टंट डायरेक्टरच्या पदासाठी कोणत्याही युनिव्हर्सिटी/संस्थेतून रसायन विज्ञान किंवा मृदा विज्ञान किंवा कृषी रसायन विज्ञानासह संबंधित विषयात एमएससी डिग्री आणि संबंधित कार्याचा तीन वर्ष अनुभव असावा. त्याचे वय 30 वर्ष असावे. तर रिसर्च ऑफिसर राजभाषा विभागात कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी/संस्थेतून हिंदीत मास्टर डिग्रीसह इंग्रजी मध्ये सुद्धा डिग्री घेतलेली असावी.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
