SBI (Photo Credits: Facebook)

SBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 26 जुलै 2021 रोजी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केले नाही त्यांच्याकडे आता सुद्धा संधी आहे. एसबीआयची अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अखेरची तारीख संपल्यानंतर कोणताही अर्ज स्विकारले जाणार नाही आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 6100 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे.

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एक ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर अद्याप परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी 6 जुलै पासून सुरु झाली आहे. उमेदवारांना अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पुर्तता सुद्धा करावी लागणार आहे. तसेच अर्जाचा शुल्क सुद्धा उमेदवारांना भरावा लागणार आहे. त्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहे.(NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती, अर्ज प्रक्रियेसंबंधित जाणून घ्या अधिक)

अप्रेंटिस पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर आता करियर सेक्शनमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी एक लिंक मिळेल. येथे तुम्हाला आता एसबीआय अप्रेंटिस भर्ती 2021 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. यामध्ये सर्व विचारण्यात आलेल्या गोष्टींची पुर्तता करा. सर्व कागदपत्र सुद्धा तुम्हाला सादर केल्यानंतर शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज स्विकारला जाणार आहे.

ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या परीक्षेवर आधारित असणार आहे. सामान्य इंग्रजी परीक्षा व्यतिरिक्त प्रश्न द्विभाषी म्हणजे इंग्रजी आणि हिंदी मध्ये असणार आहे. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापले जाणार आहेत.