NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती, अर्ज प्रक्रियेसंबंधित जाणून घ्या अधिक
(Photo credit: archived, edited, representative image)

NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण डेव्हलपमेंट बँकिंग सर्विसेस, राजभाषा सर्विसेस, प्रोटोकॉल अॅन्ड सिक्युरिटी सर्विसेस आणि डेव्हलपमेंट बँकिंग सर्विसमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदासाठी नोटीस जाहीर करण्यात आली आहे. बँकेद्वारे 15 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीनुसार ग्रेड ए आणि ग्रेड बी ऑफिसर पदासाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.

नाबार्ड असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर नोकर भरती 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 17 जुलै पासून अधिकृत वेबसाइट nabard.org येथे उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2021 पर्यंत सुरु असणार आहे. त्याचसोबत उमेदवारांनी लक्षात ठेवावे की. तुम्ही दिलेल्या ऑनलाईन अॅप्लिरेशनमध्ये आवश्यक करेक्शन सुद्धा 7 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे. अर्जाचे शुल्क सुद्धा तेव्हाच भरता येणार आहे.(BSF Recruitment 2021: सीमा सुरक्षा बलात SI, ASI आणि कॉन्स्टेबल पदासाठी नोकर भरती, अर्ज 26 जुलै पर्यंत करता येणार)

असिस्टंट मॅनेजर (ग्रेड ए) आणि मॅनेजर (ग्रेड बी) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून कमीत कमी 50 गुणांसह बॅचलर डिग्री किंवा कमीतकमी 55 टक्के गुणांसह पीजी डिग्री उत्तीर्ण असावे. उमेदवराचे वय 21 वर्षाहून कमी किंवा 30 वर्षाहून अधिक नसावे.

नोकर भरती रिक्त पद-

-असिस्टेंट मॅनेजर (रूरल डेवेलपमेंट बैंकिंग सर्विसेस) – 148 पद

-असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा सर्विसेस) – 5 पद

- असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल एवं सिक्यूरिटी सर्विसेस) – 2 पद

- मॅनेजर (डेवेलमेंटल बैंकिंग सर्विसेस) – 7 पद

उमेदवारांना नाबार्ड द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रीलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्यूच्या माध्यमातून जावे लागणार आहे. परिक्षेसाठी अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरुप यासारख्या माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या नोटिसवर पहावे.