BSF Recruitment 2021: सरकारी नोकरीची करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण सीमा सुरक्षा बलाच्या एअर विंगमध्ये कॉन्टेबल, पॅरा मेडिकल आणि वेटेरिनरी मध्ये SI,SI आणि हेड कॉन्स्टेबलच्या एकूण 285 पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी तीन विविध नोटीस जाहीर करण्यात आल्या आहेत. या नोकर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 26 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बीसीएफचे अधिकृत संकेतस्थळ rectt.bsg.gov.in वर ऑनलाईन फॉर्म भरावा. तर एअर विंग मध्ये आयएसआय आणि एएसआय पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्ष डिप्लोमा किंवा एअर फोर्सचा ग्रुप एक्स डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. त्याचे वय कमीत कमी 28 वर्ष असावे.
पीएमएस आणि वेटेरिनरी मध्ये एसआय, एएसआय पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड 10+2 आणि संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत एअर विंग, पीएमएस आणि वेटेरिनरी मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्याने सायन्समध्ये 10 वी पास असावे. त्याचसोबत कोणत्याही सरकारी संस्थेत 2 वर्षांचा अनुभव असावा. वय 20-15 वर्ष.(Maharashtra SSC Board Exam Result 2021: इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता)
दरम्यान, सीमा सुरक्षा बलामध्ये एअर विंग, पीएमएस आणि वेटेरिनरी मध्ये एसआय, एएसआय आणि कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, पीएसटी आणि मेडिकल चाचणीच्या आधारावर निवड केली जाणार आहे. विंग आणि पदाच्या नुसार लेखी परीक्षेसाठी अभ्यासाची माहिती संबंधित भरती सुचना नोटिसमध्ये पहावे.