केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून UPSC Civil Services Final Result 2021 आज (30 मे ) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम निकाल अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर पाहता येणार आहे. यंदा निकालामध्ये देशात Shruti Sharma, Ankita Agarwal आणि Gamini Singla अव्वल ठरल्या आहेत. पहिल्या चारही क्रमाकांवर मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. युपीएससी परीक्षेचा निकाल प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत फेरी अशातीन टप्प्यातील मार्क्स एकत्र करून अंतिम निकाल बनवला जातो. यामधून क्रमवारी नुसार आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी निवडले जातात. हे देखील नक्की वाचा: MPSC Rajyaseva Prelims Exam 2022: राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट दिवशी, 161 पदांवर होणार भरती; 1 जून पूर्वी mpsc.gov.in वर करा अर्ज .
कसा पहाल UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021?
- निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवर "UPSC Civil Services Result 2021 -Final Result" या लिंकवर क्लिक करा.
- आता अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी असलेली पीडीएफ फाईल ओपन होईल.
- यामध्ये पात्र ठरलेल्यांची अंतिम यादीत नाव,नंबर,गुण दिलेले असतील.
इथे पहा यशवंतांची संपूर्ण यादी
UPSC declares 2021 Civil Services Exam results
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
— ANI (@ANI) May 30, 2022
युपीएससीची प्रिलिम परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 ला झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी दरम्यान घेण्यात आली आणि 17 मार्चला निकाल जाहीर झाला. त्यानंतर 5 एप्रिल पासून 26 मे पर्यंत मुलाखतीच्या फेर्या सुरू होत्या, आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे.