पत्नीचे डोके कापून पोलिसांकडे घेऊन गेला माथेफिरू; चौकशी करताच म्हणू लागला राष्ट्रगीत, वाचा सविस्तर
Representational Image (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी या भागात शनिवारी एक विचित्र पण धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे डोके तिच्या धडापासून वेगळे करून तेच रक्तबंबाळ शीर घेऊन थेट पोलिसांकडे धाव घेतल्याचे समजत आहे.साहजिकच एखाद्या माणसाला हातात डोके पकडून चालताना पाहिल्यावर सामान्य माणसाला जितका धक्का बसेल तितकेच हे पोलीस सुद्धा आश्चर्यचकित झाले. मात्र भानावर येताच त्यांनी या माथेफिरूंकडून हे कापलेले शीर घेण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळीस हा इसम चक्क राष्ट्रगीत म्हणत भारत माता की जय च्या घोषणा देऊ लागला. जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरातील बहादूरपूर गावात ही निर्घृण घटना घडली.

पोलिसांच्या तपासानुसार, या दाम्पत्याचे मागील काही काळापासून सतत भांडण होत होते, याच किरकोळ वादातून या इसमाने शनिवारी हे पाऊल उचलले आणि आपल्या पत्नीला जीवे मारून पुढे हा सर्व प्रकार घडला. आरोपीचे नाव अखिलेश रवात असल्याचे समजत आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.  धक्कादायक! नाचत नाही म्हणून नौटंकीवाल्या तरुणीवर भर लग्नात गोळी झाडली; रुग्णालयात उपचार सुरु मात्र अवस्था गंभीर (Watch Video)

यापूर्वी देखील अनेकदा असे अमानुष प्रकार समोर आले होते. मोरोक्को मधील एका महिलेने तिच्या प्रियकराचे दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचे ठरले असता रागाच्या भरात त्याची हत्या केली होती. एवढच नसून प्रियकराच्या शरीराचे तुकडे कापून ते मिक्सरमधून काढून त्याची चक्क बिर्याणी बनवली. ही मानवी बिर्याणी महिलेने आपल्या परिसरातील कामगारांना खाऊ घातली होती. या प्रकारच्या घटनांमध्ये भांडण किंवा हिंसेपेक्षा विकृती अधिक कारणीभूत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.