उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मैनपुरी (Mainpuri) जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, या ठिकाणी एका व्यक्तीवर शेळीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मनू सागर याला अटक केली असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करता यावा म्हणून शेळीचे शरीर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांना धक्का बसला आहे आणि प्राण्यांच्या हिंसेविरोधात कठोर कायदे करण्याची मागणी होऊ लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर प्राण्यांबाबतच्या अशा घटनांमुळे समाजात जागरूकता वाढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बकरीच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करून न्यायप्रक्रिया योग्य दिशेने नेली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शवविच्छेदनानंतरच या घटनेचे वास्तव स्पष्ट होणार असून, आरोप खरे ठरल्यास आरोपीवर कायदेशीर कलमांखाली कठोर कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर मैनपुरीचे स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि प्राणी कल्याणकारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, प्राण्यांवरील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे. या घटनेतील दोषीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी काही लोकांनी आंदोलनही केले. या घटनेनंतर प्राणी हक्क संघटनांनी सरकारला प्राण्यांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्याची विनंती केली आहे. (हेही वाचा: भयानक! दारुड्याकडून तीन महिन्याच्या गरोदर शेळीवर बलात्कार)
वृत्तानुसार, आरोपी मनू सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे. मादक पदार्थांच्या गैरवापरासाठी सागरवर यापूर्वीही आईवर कथित लैंगिक अत्याचार आणि महिला पोलीस अधिकाऱ्याचा छळ, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासाठी त्याने दीड वर्ष तुरुंगवास भोगला आहे. सागरच्या वागण्याचा त्याच्या कुटुंबावरही गंभीर परिणाम झाला आहे; शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कृत्यामुळे त्याची आई आणि अंध वडिलांनी आश्रमात आश्रय घेतला आहे.