UP Election: लखमीपुर येथे EVM मशीनमध्ये टाकले फेविक्विक, सपा पक्षाचे बटण दाबले जात नसल्याची EC अधिकाऱ्यांकडे तक्रार
EVM (Photo Credit - File Photo)

UP Election: उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याच दरम्यान लखीमपुर येथील खीरी जिल्ह्यातील विधानसभेच्या जागेवर एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. खरंतर लखमीपुरच्या विधानसभा क्षेत्रात कादीपुर सानी पोलिंग बूथवर लावण्यात आलेल्या ईवीएम मशीनवर मुद्दाम फेविक्विक टाकण्यात आले. याच कारणामुळे जवळजवळ दीड तास मतदान थांबले गेले.

माजी आमदार आणि समजावादी पक्षाचे उमेदवार उत्कर्ष वर्मा यांनी म्हटले की, कोणती तरी मुद्दाम पहिले जे बटण आहे तेथे फेविक्विक टाकले. त्या कारणामुळे ते दाबले जात नव्हते. आम्ही याची तक्रार निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना केली.वर्मा यांनी पुढे असे म्हटले की, ज्याने कोणीही हा प्रकार केला आह त्याच्या विरोधात कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत. सीसीटीव्हीमध्ये त्याचा फोटो जरुर येईल.(मोदी सरकारची मोठी कारवाई, सिख फॉर जस्टिस संबंधित App, बेवसाइट आणि सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक)

मतदानासाठी आलेल्या एका मतदाराने असे म्हटले की, येथे सकाळ पासून मतदान सुरु आहे, आम्ही रांगेत उभे होतो तेव्हाच आम्हाला कोणीतरी सांगितले की, ईवीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकले आहे. त्यामुळे बटण दाबले जात नाही आहे. आम्ही दोन तास उभे राहिल्यानंतर काही अधिकारी आले.

दरम्यान, लखीमपुर खीरी येथील 8 जागांवर मतदान पार पडत आहे. येथे गेल्य वर्षात भाजपचा दणदणीत पराभव झाला होता. परंतु यंदा तिकुनिया हिंसा हा मुद्दा आहे. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. लखमीपुरचे खासादार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या परिसरात सुद्धा मतदान पार पडत आहे. तेथे मुलगा आशीष मिश्रा याच्या जमिनादरम्यान जनतेकडून आपला निर्णय ईवीएममध्ये कैद करत आहे. शेतकऱ्यांना धडक देणाऱ्या कांडनंतर येथे भाजपचा रस्ता खडतर आहे. विरोधकांकडून सातत्याने तिकुनिया हिंसाचारावर भाजपवर सडकून टिका करत आहे.