National Highway (Photo Credits-Wikipedia)

देशभरात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सरकारने लॉकडाऊनचे आदेश जाहीर केले आहेत. मात्र अनलॉक 1 (Unlock 1)  नुसार गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने (MHA) मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. त्या अंतर्गत रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याच दरम्यान आता गृह मंत्रालयाने महामार्गावरुन बस किंवा ट्रकच्या माध्यमातून प्रवास करण्यास मुभा असणार आहे. पण लोकांना गर्दी करण्यावर बंदी कायम असणार आहे.

केंद्र सरकारने रात्रीच्या वेळेस मालवाहू ट्रक आणि प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसच्या प्रवासाला मंजूरी दिली आहे. खरंतर काही राज्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने निर्देशन दिल्यानंतर राज्यासह सर्व राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांचा प्रवास सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(धक्कादायक! भारतात नव्या COVID-19 रुग्णांच्या संख्येने पार केला 10 हजारांचा टप्पा, देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,97,535 वर)

गृह मंत्रालयाने शुक्रवारी यासंबंधित नवी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. खरंतर संचार बंदीच्या आदेशानंतर विविध सुरक्षा आणि ईडी कडून बस आणि ट्रक यांची अडवणूक करण्यात येत होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देत असे म्हटले आहे की, महामार्गावरुन बस किंवा ट्र्क मधून जाणाऱ्या नागरिकांना मुभा असणार आहे.