Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन (Lock Down) जारी केले आहे. तरीही काही मंडळी नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात, या लोकांना सरकार, राजकीय मंडळी, पोलीस यंत्रणा सर्वांनी आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अद्याप परिस्थिती फार काही बदललेली दिसत नाही, आता या लोकांना समजवण्यासाठी चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हात जोडून विंनती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी एक नवी कविता बनवून ती ट्विटरच्या माध्यमातून सादर केली आहे. "कोई ना निकलो रोडपर, ये कहता हूँ हात जोडकर" असे म्हणत आठवले यांनी सर्व देशवासियांना घरातच राहा अशी विनंती केली आहे. Coronavirus Lock Down: महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO

कोरोनाचा फैलाव देशात सुरु होताच रामदास आठवले यांचा गो कोरोना (Go Corona)  व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये काही चिनी नागरिकांच्या सोबत त्यांनी कोरोनाला हटवण्यासाठी गो कोरोना अशा घोषणा दिल्या होत्या हे त्यांचे वाक्य इतके हिट झाले की जेव्हा 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू दरम्यान संध्याकाळी टाळ्या आणि थाळ्या वाजवत वैद्यकाईचे कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यास सांगितले होते, तेव्हा सुद्धा लोकांनी गो कोरोनाची नारेबाजी केली होती. त्यांनतर आता आठवले यांची ही नवी स्वलिखित कविता सुद्धा चांगलीच व्हायरल होत आहे.Corona virus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)

रामदास आठवले ट्विट

दरम्यान, कोरोनामुळे 14 एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊन असणार आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश याकाळात बंद असणार आहेत. देशात आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1000 च्या पार गेल्याने चिंतेचे वातावरण आहे. हे संकट दूर करण्यासाठी आता लोकांनी दृढनिशाचं करून घरातच राहायला हवे असे आव्हान आज महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. महाराष्ट्रात सुद्धा आता सर्वाधिक म्हणजेच 203 रुग्ण आहेत.