Amit Shah | (Photo Credit - Twitter/ANI)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2022 ) दुसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे 'द क्रिमिनल प्रोसीजर (आयडेंटिफिकेशन) विधेयक (Criminal Procedure (Identification) Bill) संसदेत सादर करणार आहेत. हे विधेयक संसदेत मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर झाल्यास पोलिसांना अधिक अधिकार मिळणार आहेत. त्यामुळे या विधेयकाची सदनात येण्यापूर्वीच जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, इतरही काही विधेयके आणि मुद्दे सभागृहात चर्चेला येणार आहेत.

गुन्हेगारी कारवाया (ओळख) विधेयक 2022 ("The Criminal Procedure (Identification) Bill, 2022") मध्ये कोणत्याही एखाद्या गुन्ह्यात किंवा तशा प्रकरणात अटक आणि दोषी गुन्हेगाराचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांची किंवा साधनसामग्रीचा वापर करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. (हेही वाचा, Disha Salian Death Case:अमित शाह यांचा फोन? नारायण राणे यांनी चक्क खोटा दावा केला? पोलिसांनी न्यायालयात काय म्हटले पाहा)

कोरोना व्हायरस महामारीचे संकट विचारात घेता या वेळी संसदीय अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. यातील पहीला टप्पा 31 जानेवारीला सुरु झाला होता. जो 11 फेब्रुवारीला संपला. संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 14 मार्च रोजी सुरु झाला होता. जो 8 एप्रिल रोजी समाप्त होणार आहे.