'अमित शाह ( Amit Shah) यांचा फोन आल्यानंतर पोलिसांनी मला सोडले' हा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेला दावा चक्क खोटा असल्याचे पोलिसांची म्हणने आहे. अभिनेता दिवंगत सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीत हा खुलासा झाला आहे. नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश यांना मालवणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चौकशीला बोलावले होते. या वेळी दोन्ही पिता पुत्रांना पोलीसांनी प्रदीर्घ काळ चौकशीसाठी थांबवून ठेवले होते. चौकशी झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी 'पोलिसांनी आपल्याला मुद्दाम थांबवून ठेवले. शेवटी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोन आल्यानंतर आपल्याला सोडण्यात आले' असा दावा राणे यांनी केला होता.
दिशा सालियन हिच्या मृत्यू पश्चात नारायण राणे आणि त्याचे पुत्र नितेश राणे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, राणे यांनी केलेल्या आरोपावरुन दिशा सालियान हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन झाल्याचा दावा करत नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दिशाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणीत मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राण चौकशी साठी बोलावले होते. (हेही वाचा, Maharashtra: दिशावरुन केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सलीयन परिवाराची पोलिसात तक्रार, राणे पिता-पुत्र अटकपूर्व जामिनासाठी करणार अर्ज)
दरम्यान, राणे पिता-पुत्रांना दिंडोशी न्यायालयाने अटकेपासून काही काळ दिलासा दिला आहे. मात्र, तरीही त्यांना पोलिसांमध्ये जबाब नोंदविण्यासाठी हजर व्हावे लागले. पोलिसांनी त्यांची जवळपास 9 तास कसून चौकशी केली. दरम्यान, नारायण राणे यांनी वकील सतीश माने शिंदे यांच्याद्वारे आपल्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिशा सालियान हिची वासंती यांच्या तक्रारीवरून नोंद झालेला गुन्हा हा राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा युक्तीवाद अॅड. सतीश माने शिंदे यांनी न्यायलयात केला आहे.