देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर पोहचली- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
Coronavirus (Photo Credits: PTI)

चीन मधील वुहान (Wuhan) शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढण्यासोबत नवी प्रकरणे सुद्धा समोर येत आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नवीन प्रवासी नियमावली सुद्धा जारी केली आहे. तर आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी कोरोना व्हायरस संबंधित एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत कोरोना बाबत माहिती देत असे म्हटले आहे की, देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 वर पोहचली आहे. त्यामुळे विमानतळावर बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना व्हायरसबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 28 वर पोहचला आहे. तसेच आयटीबीपीच्या कॅम्पमधील 17 जणांना कोरोना तर इटली येथून आलेल्या 16 जणांना कोरोना व्हायरस झाला आहे. इटलीमधून आलेल्या 16 पैकी 1 जण हा भारतीय नागरिक असल्याचे ही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. परंतु कोरोना व्हायरसला दोन हात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून रुग्णालयात यासाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश ही हर्षवर्धन यांनी दिले आहेत.(Coronavirus: केंद्र सरकारची नवीन प्रवासी नियमावली जारी: चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास टाळावा, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा भारतीयांना सल्ला)

विमानतळावर मंगळवार पर्यंत 5,89,000 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी 15 हजार कमीत कमी आणि अधिकाधिक 10 लाख जणांचे नेपाळच्या सीमेवर तपासणी करण्यात आली आहे. तसेच विमानतळावरील प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग करण्यात येणार असल्याचे ही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. तर भारतीयांना चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास करणे टाळा, असा सल्लाही दिला आहे.