साऊथ ईस्ट इंग्लंड मध्ये युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी टीअर 4 लॉकडाऊन जाहीर करत नागरिकांना ब्रिटनमध्ये कोरोना वायरसने रूप बदलल्याची माहिती दिली आहे. हा वायरस झपाट्याने पसरत असून त्याच्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याचा अंंदाज आहे. दरम्यान कोरोना वायरसच्या या बदलत्या रूपामुळे जगात चिंता व्यक्त केली जात असली भारतामध्ये सरकार दक्ष असल्याची माहिती आज (21 डिसेंबर) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr Harsh Vardhan) यांनी दिली आहे. यावेळेस त्यांनी कोरोनाच्या या रूपामुळे घाबरून जाण्याची गरज नाही असे देखील म्हटलं आहे. आज संध्याकाळी आरोग्य मंत्रालयाबाबत याबाबत एक तातडीची बैठक देखील बोलावली आहे. Italy मध्ये आढळला Britain मधील कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीच्या विषाणूची लागण झालेला रूग्ण.
दरम्यान युके मधील या नव्या वायरसमुळे वाढती रूग्नसंख्या पाहता इतर युरोपियन देशांनी आपल्या सीमा ब्रिटनच्या पर्यटकांसाठी बंद केल्या आहे. अनेक देशांनीही आपल्या सीमा बंद करत युके मधून येणार्या विमानांना रोखलं आहे. दरम्यान भारतामध्ये अद्याप विमानसेवा रोखली गेलेली नाही.
ANI Tweet
The government is alert. There is no need to panic: Union Health Minister Dr Harsh Vardhan on the discovery of the new strain of coronavirus in UK pic.twitter.com/BnV09c0cbQ
— ANI (@ANI) December 21, 2020
भारत-युके दरम्यान एअर बबल आणि वंदे भारत मोहिमेअंतर्गत विमानसेवा नियमित सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्राने इंग्लंडमधून येणार्या विमानसेवा रोखण्याबाबत विचार करावा असा सल्ला दिला आहे. दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ब्रिटनच्या स्थितीचा दाखला देत नागरिकांना हिवाळ्यात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.