UGC. (Photo Credits: Wikipedia)

University Grant Commissions कडून बनावट ऑनलाईन प्रोग्राम द्वारा विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याच्या घटनांवरून आता जागं झालं आहे. BBA, MBA अशी abbreviations लिहित दिशाभूल करणार्‍या जाहिरातींबाबत सजग राहण्याचा युजीसीने सल्ला दिला आहे. अधिकृत नोटीस मध्ये दिल्या नुसार, काही व्यक्ती/संस्था उच्च शिक्षण प्रणालीच्या मान्यताप्राप्त पदवी कार्यक्रमांप्रमाणेच संक्षिप्त स्वरूपासह ऑनलाइन कार्यक्रम आणि अभ्यासक्रम ऑफर करत आहेत. त्याबाबत सावध रहा. भ्रामक संक्षिप्त स्वरूपांपासूनही दूर रहा असा संदेश देण्यात आला आहे.

'10 Days MBA' असा एक ऑनलाईन प्रोगाम जारी करण्यात आला होता. त्याचा दाखला देत युजीसीने विद्यार्थ्यांना अलर्ट केले आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की अभ्यासक्रमाचा कालावधी, प्रवेश पात्रता आणि सर्व पदवींसाठी मंजूर संक्षेप UGC द्वारे काटेकोरपणे जारी केले जातात आणि केंद्र सरकारच्या मंजुरीची त्यासाठी आवश्यकता असते. UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठेच या पदव्या देऊ शकतात. अनेकदा तरूणाई नोकरीत बढतीसाठी कामासोबत शिकतात. आता वेळ वाचवण्यासाठी अनेक देशातील, परदेशी संस्था ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून देतात पण यामध्ये फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत.

UGC ने विद्यार्थ्यांना नावनोंदणी करण्यापूर्वी ऑनलाइन कार्यक्रमांची वैधता पडताळण्याचा सल्ला दिला आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठांची यादी आणि मान्यताप्राप्त ऑनलाइन प्रोग्रामसाठी यूजीसी वेबसाइट तपासून पहा असे त्यांनी सांगितले आहे. कार्यक्रम तपशीलांची पुष्टी करण्यासाठी विद्यार्थी थेट विद्यापीठाशी संपर्क साधू शकतात.