शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेतून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तोफ धडाडली आहे. संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray Speech) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप हा एक फुगा आहे. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं, या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्ही केलं होतं. ती हवा आता त्यांच्या डोक्यामध्ये गेली, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. (हेही वाचा - Prakash Ambedkar: "पण आपल्यालाल लढावं लागणार..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार)
ते म्हणतात 400च्या पार. काय फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवताय का? असं म्हणत ठाकरेंनी भाजपची खिल्ली उडवली. आज देशभरातून आणि सगळ्या राज्यातून महत्त्वाचे नेते येथे आलेत. आपल्याला वाटत असेल की, ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात आहे. पण तसं नाहीय केरळ ते काश्मिरपर्यंत हीच परिस्थिती आहे. जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करतात. तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही. तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढंच आहे, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर घणाघात केलाय.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाही कितीही मोठी असला, ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास थोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, त्यामुळे आपल्या मध्ये जो फूट पाडतोय त्याला थोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा अशी सांगायची वेळ आलेली आहे.'