काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरु झाली होती. आज या यात्रेचा मुंबईत समारोप झाला. आज रविवारी शिवाजी पार्कवर काँग्रेसची भव्य सभा झाली. या सभेत इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. शरद पवार, मेहबुबा मुफ्ती, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडक या सभेत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसची ही पहिलीच सभा आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली. आपल्या सर्वांना लढावं लागेल. एकत्र लढू किंवा वेगळं लढू, पण आपल्यालाल लढावं लागणार आहे, असे प्रकश आंबेडकर म्हणाले. (हेही वाचा - Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी)
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Mumbai, Maharashtra: The INDIA Alliance leaders pose at the concluding program of the Bharat Jodo Nyay Yatra pic.twitter.com/nlMexcigmK
— ANI (@ANI) March 17, 2024
आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे. मोदींचा देश परिवार आहे असे म्हणतात पण त्यांचा परिवारातील व्यक्ती त्यांच्यासोबत राहत नाहीत. मोदींनी त्यांच्यासोबत राहायला हवं. कारण ही आपली संस्कृती आहे. आरएसएसने याबाबत सांगितले आहे. ईव्हीएम मशिन अमेरिकेतून येते पण त्यातील चिप 20 ते 25 रुपयाला बाजारात विकत मिळताता. ईव्हीएम चौकशीसाठी सर्वांना लढावं लागेल. राहुल गांधींनी पुढाकर घेतला तर आम्ही लढायला तयार आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
निवडणूक रोख्यांवर अमित शाहांचे विधान प्रत्येक चॅनेलवर येत आहे की आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढला आहे, पण मला मोदीजी आणि अमित शहा यांना विचारायचे आहे, फ्युचर इज गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस कंपनी कोणाची? निव्वळ नफा 215 कोटींचा आहे आणि त्यांनी 1360 कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड्स खरेदी केले आहेत. जेव्हा कंपनीचा नफा 200 कोटी आहे, तेव्हा त्यांनी 1300 कोटींचे बाँड कोठून विकत घेतले याचे वर्णन असावे. आम्ही त्यांना टार्गेट करणार की नाही? हा प्रश्न आम्ही मोदींना विचारू की नाही? याचा खुलासा त्यांनी करावा.