Tunnel Discovered At Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत सापडला रहस्यमयी ब्रिटीशकालीन बोगदा; लाल किल्ल्यापर्यंत जातो गुप्त रस्ता, जाणून घ्या सविस्तर 
Tunnel Discovered At Delhi Assembly (Photo: ANI)

गुरुवारी दिल्ली विधानसभेत (Delhi Legislative Assembly) एक बोगद्यासारखी (Tunnel) रचना सापडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले की, हा बोगदा विधानसभेला लाल किल्ल्याशी (Red Fort) जोडतो. कदाचित ब्रिटिशांनी या बोगद्याचा वापर स्वातंत्र्य सैनिकांना न्यायालयात आणण्यासाठी केला असावा. राम निवास गोयल यांनी यावेळी सांगितले की, ‘ते जेव्हा 1993 मध्ये आमदार झाले तेव्हा येथे असलेल्या बोगद्याबद्दल अफवा पसरली होती. त्यावेळी असे सांगितले जात होते की हा रस्ता लाला किल्ल्याकडे जाते.

त्यावेळी गोयल यांनी या बोगद्याच इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याबाबत माहिती मिळाली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या फक्त या बोगद्याचे तोंड सापडले आहे. परंतु ते पुढे खोदता येणारा नाही, कारण मेट्रो प्रकल्प आणि गटार बसवल्यामुळे बोगद्याचे पुढील सर्व मार्ग नष्ट झाले आहेत. ते पुढे म्हणाले की इतिहासात या बोगाद्याबाबत काही माहिती मिळाली नाही, की हा बोगदा नक्की काय आहे. (हेही वाचा: Mumbai Crime: मुंबईत पत्नीची हत्या करून पळून जाण्याचा डाव फसला, इटारसी जंक्शनवर आरपीएफ जवांनानी आवळल्या मुसक्या)

परंतु ज्या पद्धतीची त्याची रचना केली गेली आहे, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की याचा वापर ब्रिटिशांनी केला असावा. गोयल यांनी सांगितले की, राजधानी 1912 मध्ये कोलकाताहून दिल्लीला हलवल्यानंतर, ज्या इमारतीत सध्या विधानसभेचे कामकाज होत आहे ती इमारत दिल्ली विधानसभेचा केंद्रीय भाग म्हणून वापरण्यात आली होती. पुढे त्याचे 1926 मध्ये न्यायालयात रूपांतर करण्यात आले. दिल्ली विधानसभा आणि लाल किल्ल्यातील अंतर सुमारे 5.6 किलोमीटर आहे.

त्यावेळी दिल्ली विधानसभेच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूला फाशीचे घर बांधण्यात आले होते, जेथे क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. गोयल म्हणाले की, या खोलीचे स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली म्हणून मंदिरात रुपांतर केले जाईल. पुढच्या वर्षी पर्यटकांनाही या बोगदा व हे फाशी घर पाहण्यासाठी खुले होईल.