
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इटारसी (Itarsi) जंक्शनवर मुंबईतून पत्नीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात रेल्वे संरक्षण दलाला (RPF) यश आले आहे. त्याच्यासोबत तीन वर्षांची मुलगीही होती. आरोपीचे नाव सरताज असून तो ट्रेन क्रमांक 2617 मंगलदीपमध्ये प्रवास करत होता. आरपीएफ इटारसीचे स्टेशन प्रभारी देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या पोलीस ठाण्याला (Police Station) गुन्हे शाखा ठाण्याकडून माहिती मिळाली होती की एक व्यक्ती मुंबईत पत्नीची हत्या केल्यानंतर रेल्वे स्टेशनवरून क्रमांक 02617 ने पळून जात आहे. या माहितीच्या आधारावर भुसावळ आणि खंडवा स्थानकांवर तपासणी करण्यात आली. परंतु तो सापडला नाही. कारण सरताज स्टेशनवर येण्यापूर्वी ट्रेनमध्ये कुठेतरी लपून बसला होता. यानंतर आरोपीचा फोटो व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात आला आणि शोधासाठी एक टीम तयार करण्यात आली.
स्टेशन प्रभारी देवेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरताजच्या शोधासाठी तयार केलेल्या टीमच्या सदस्यांनी साध्या कपड्यांमध्ये रेल्वेच्या प्रत्येक सीटवरील प्रवाशांना जागे केले आणि तपासणी केली. ज्यावर एक तरुण तीन वर्षांच्या मुलीसोबत कोच क्रमांक एस 10 च्या बर्थ क्रमांक सातवर झोपलेला आढळला. त्याची चौकशी केली असता त्याने नाव चुकीचे सांगितले. तसेच त्या मुलीला आपली मुलगी म्हणून सांगितले. गुन्हे शाखा मिळालेल्या माहितीनुसार अधिक तपासानंतर तोच आरोपी असल्याचे सिद्ध झाले. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
सरताजला वाहनातून उतरवून मुलीसह आरपीएफ स्टेशनवर आणण्यात आले. याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यात देण्यात आली. आरोपीला आरपीएफ पोलीस ठाण्यात आणि मुलीला जीवोदय चाईल्ड लाइन इटारसी येथे ठेवण्यात आले होते. आरोपी आणि मुलीला शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्यातून आलेल्या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हेही वाचा Kerala: धक्कादायक! अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर राहिली गर्भवती; बाळाच्या जन्मानंतर भृण केला वॉशरूममध्ये फ्लश
गुन्हे शाखा ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी आरोपी सरताजच्या पत्नीचा आगीमुळे मृत्यू झाला. आरोपी पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. जिथे मृत्यूची झाल्याची माहिती दिली. काही वेळाने पती घटनास्थळावरून पळून गेला. शवविच्छेदन अहवालात या महिलेचा हत्या झाल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी 302 चा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पतीचा शोध सुरू केला. सरताज मुरादाबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर पोलिसांनी याची नोंद करत अखेर त्याच्या मुसळ्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.