धावत्या ट्रेनमध्ये डॉक्टर मिळेना; TTE ने केली महिलेची सुखरुप प्रसुती
TTE of delhi division helped a woman deliver baby at night in Railway (Photo Credits: Twitter)

रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्याने रेल्वेत तिची प्रसुती करण्यात आली. मात्र ही प्रसुती डॉक्टरने नाही तर चक्क TTE (Travelling Ticket Examiner) ने केली आहे. महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्याची माहिती टीसीला देण्यात आली. त्यानंतर टीसीने गाडीत कोणी डॉक्टर आहे का याची विचारणा केली. मात्र कुणीही डॉक्टर उपलब्ध न झाल्याने टीसीने इतर प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसुती केली. (एसटीमध्ये महिलेची प्रसुती, बाळाला तेथेच सोडून आईने काढला पळ)

एच. एस. राणा असे या टीटीई यांचे नाव असून ते रेल्वेच्या दिल्ली विभागात (Delhi Division) कार्यरत आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रेल्वे प्रशासनाने देखील टीसीच्या माणुसकीचे आणि चांगल्या कामाबद्दल अभिमान वाटत असल्याचे ट्विट केले आहे.

INDIAN RAILWAYS ट्विट:

रेल्वेत प्रसुती होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही रेल्वेत अनेक महिल्यांची प्रसुती झाली आहे. मात्र टीसीने दाखवलेल्या या  माणुसकीचे कौतुक करण्यासारखे आहे.